गुरुवार, १३ ऑक्टोबर, २०१६

प्राण्यांची शाळा Animals School

*ज्ञानदचनावादी मनोरंजक उपक्रम*

*माझी शाळा सुदंर शाळा*  उपक्रम क्र.४.*

*जि.प.प्रा.शा. ढोलेवस्ती (रांझणी)
ता. पंढरपूर जि. सोलापुर*
विजागत ज्ञानेश्वर*
9421295027

उपक्रमाचे नांव :- *प्राण्यांची शाळा*

*उपक्रम क्र.४.*
*शिक्षकांसाठी उपक्रमपुर्व सुचना* -
१) शिक्षकाने सर्व प्रथम वेगवेगळे प्राण्यांचे मुखवटे तयार करुन घ्यावेत
२) प्रत्येक मुलाला मुखवटा देवुन प्राण्यांचे नांव सांगावे.
(अधिक माहितीसाठी लिंकवरुन फोटोसह माहिती घ्या.)
Click Here

*कृती

* प्रथम सर्व विद्यार्थ्यांना गोल रिंगण करुन उभा करावें किंवा बसवावे.
* सर्वात पहिल्यांदा प्राण्यांचा राजा येईल सिंह (त्याला एखादा कोणताही विषय द्यावा उदा. मुली वाचवा,जंगलतोड इ.
* पहिल्यांदा जो विषय राजा सांगेन त्या विषयावर सर्व प्राणी (मुले) आपले मत जसे येईल तसे सांगतिल. (शिक्षकांना अडचण येईल तेथे सुचना करावी.
*  जंगलतोड विषय घेतला तर जंगलतोड का केली असावी?,कोणी केली?, आणि उपाय कोणते? या वर मुलांना (प्राण्यांना) बोलायला सांगावे.
*  अशा रितीने जेवढे प्राणी असतील तेवढयांना बोलायला सांगावे (वाघ, सिंह हत्ती,कोल्हा,ससा,शेळी, बैल, मेंढी असे प्राणी घ्यावेत)
* अशा प्रकारे विविध विषय घेवून प्राणी येतील व विषय मांडतील (शिक्षकांनी विषय सांगण्यास मदत करावी)
* जर विषय नसेल सुचला नाही तर जो प्राणी आहे त्यांची माहिती सांगावी.
* उदा. शेळी प्राणी घेतला तर ,काय खातो? कोठे राहतो? पाय किती? असे प्रश्नांची उत्तरे द्यायला सांगांवी.
(अधिक माहितीसाठी लिंकवरुन फोटोसह माहिती घ्या.)
 Click Here
* अशा प्रकारे *प्राण्यांची शाळा* भरवता येईल. आणि विविध प्राण्यांची मराठीत,हिंदीत,इंग्रजीत माहिती देता येईल.
*चेहऱ्याला मुखवटे लावल्यांने मुलांचे मनोरंजन होईन.
*सर्व प्राणी झाले की मग मुखवटे मुलांनाी बदलून घ्यावे.
*जो चांगला प्रतिसाद देतो तो त्या शाळेचा राजा असणार आहे.

फायदे :-

1) मुलांना शाळेविषयी आवड निर्माण होईन.
२) विविध प्राण्यांची ओळख होईन.
३) आनंदी वातावरणातून खेळ व अध्यापन होईन.
४) शारीरीक, मानसिक,बौध्दीक खेळामुळे मुलांचे आनंदी वातावरणात शिक्षण होईन..
५) कल्पना शक्तीला वाव मिळेल
६) विविध विषय मांडताना विचार व बुध्दीचा कस लागेल.
एकवेळ प्राण्यांची शाळा भरावाच !  शिकणाराला व शिकवणाराला मिळणारा आनंद खुपच मोठा असणार आहे.चला तर मग *प्राण्यांच्या शाळेत*
अधिक क्षणचित्रासह माहिती घेण्यासाठी लिंक
Clilck Here
आपलाच मित्र

विजागत ज्ञानेश्वर*

9421295027
उपक्रमाविषयी प्रतिक्रियासाठी खालील लिंक वर जावून प्रतिकिया नोंदवा
https://goo.gl/XKsMRt

२ टिप्पण्या:

THANK YOU