ज्ञानदचनावादी मनोरंजक उपक्रम*
*माझी शाळा सुदंर शाळा* उपक्रम क्र.४.*
*जि.प.प्रा.शा. ढोलेवस्ती (रांझणी)
ता. पंढरपूर जि. सोलापुर*
विजागत ज्ञानेश्वर*
9421295027
उपक्रमाचे नांव :- *आकाश कंदील तयार करणे*
उपक्रमाविषयी प्रतिक्रियासाठी खालील लिंक वर जावून प्रतिकिया नोंदवा
आकाश कंदील तयार करणे
- साहित्य -
विविध रंगाचे चिकट टेप, कात्री, कार्डशिट पेपर, कटर,डिंक,विविध रंगांचे क्राप्ट पेपर, दोरी, मापासाठी मोजपटटी पंचीग मशीन इ.
- पुर्व तयारी
* प्रथम 21X32 किंवा 21X40 तुम्हाला हवी असेल ती साईज चे विविध कार्डशिटचे पेपर कापून घावेत.
* 4X4 व 3X3 चे कागद एक समान कापून घ्यावेत.
- कृती-
* 21X32 किंवा 21X40 चे तुम्हालो हवे ते कागद कापून घ्यावेत.
* त्याला दंडगोलकार प्रथम चिकटवून घ्यावे.
* त्यांनंतर 4X4 च्या कापलेल्या कागदावर 3X3 चे पेपर चिकटवून घ्यावेत.
* 4X4 चे तयार झालेले कागदाला कर्णमध्ये दुमडून घ्यावे चित्रात दापखवल्या प्रमाणे
* तयार झालेले डिजाईन 4X4 च्या दंडगोलावर चिकटवावे. अशा पध्दतीने 6 डिजाईन थोडे अंतर ठेवून बसवून घ्यावेत
* दंडगोलाच्या वरील बाजूला अगोदर चिकट टेप लावावा. त्याच्य वर रंगीत चिकट टेप लावावेत.
* खालच्या भागात कात्रीने विविध काप घेवून चिकटवावे त्यावर रंगीत चिकट टेप चिकटवावे.
* वरील बाजूला पंचींग मशीन छिद्र पाडून लेस अथवा दोरा बांधावा.
झाला तुमच आकर्षक आणि सुंदर आकाश कंदील घरच्या घरी तयार.
2) गोलाकार आकाश कंदील तयार करणे.
साहित्य -विविध रंगाचे चिकट टेप, कात्री, कटर,कार्डशिट पेपर, डिंक,विविध रंगांचे क्राप्ट पेपर, दोरी, मापासाठी
मोजपटटी पंचीग मशीन इ.
- पुर्व तयारी
* प्रथम 21X32 व 21X36 तुम्हाला हवी असेल ती साईज चे विविध कार्डशिटचे पेपर कापून घावेत.
कृती-
* 21X32 व 21X36 चे कागद कापून घ्यावेत.* 21X32ला दंडगोलकार प्रथम चिकटवून घ्यावे.
* त्यांनंतर 21X 36 ला खाली १ सेमी व वर १ सेमी मार्किग करुन घ्यावे वर १ सेमी सोडून कटरने उभे काप
घावेत
* 21X32 च्या दंडगोलला चिकटून घ्यावेत.
* खालच्या भागात कात्रीने विविध काप घेवून चिकटवावे त्यावर रंगीत चिकट टेप चिकटवावे.
* वरील बाजूला पंचींग मशीन छिद्र पाडून लेस अथवा दोरा बांधावा.
झाला तुमच आकर्षक आणि सुंदर आकाश कंदील घरच्या घरी तयार.
उपक्रमाविषयी प्रतिक्रियासाठी खालील लिंक वर जावून प्रतिकिया नोंदवा

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
THANK YOU