मनोरंजक उपक्रम
जि.प.प्रा.शा. ढोलेवस्ती (रांझणी)
ता. पंढरपूर जि. सोलापुर
उपक्रमाचे नांव
* भाजी घ्या ,फळ घ्या, फुलं घ्या*
*कृती(सदरील पोस्ट ही www.esmartguruji.blogspot.in copy pest केली आहे. )
✍🏼ज्ञानरचनावाद मनोरंजक उपक्रम नं 1.✍🏼
🌄जि.प.प्रा.शा. ढोलेवस्ती (रांझणी) ता. पंढरपूर जि. सोलापुर🌅
उपक्रमाचे नांव :👉🏻
🌿🍃🍋💐 भाजी घ्या ,फळ घ्या, फुलं घ्या💐🍋🍃🌿
कृती
👫 प्रथम सर्व विद्यार्थ्यांना गोल रिंगण करुन उभा करावे.
👬 एका विद्यार्थ्याला भाजी घ्या ,फळ घ्या, फुलं घ्या असे म्हणत गोल फिरत भाजीवाल्याची नक्कल करायला लावावी
👫भाजी किंवा फळ किंवा फुल यापैकी फिरत असताना कोणत्याही विद्यार्थ्यांच्या समोर जावुन तीन पैकी (भाजी घ्या /फळ घ्या/ फुलं घ्या)
म्हणायला लावा.
उदा. भाजीवाला विकणारा म्हणाला फळ घ्या ! त्यावेळी ज्या विद्यार्थ्याच्या समोर आहे त्यानी लगेच कोणत्याही फळाचे नांव सांगावे.
👬जो मुलगा बरोबर उत्तर देईन त्याच्यासाठी टाळया वाजवाव्यात
👫*पुन्हा भाजीवाला दुसऱ्या विद्यार्थ्याच्या समोर जावुन भाजी घ्या म्हणेन तेव्हा ज्या विद्यार्थ्यासमोर भाजी घ्या म्हणतो त्याच विद्यार्थ्याने जर लगेच उत्तर दिले तर ठीक नाही तर तो भाजीवाला होईन.
👬 कोणतेही फळ पुन्हा विकता येणार नाही यांची काळजी घ्यावी.
👫ज्याला फळाचे नांव जलद सांगता येणार नाही तो विद्यार्थ्यी संधी घेवुन भाजी विकेन. म्हणजे तो विद्यार्थी भाजीवाला होइेन आणि जो
विद्यार्थ्यी भाजी /फळ/फुल विकत होता तो त्याच्या जागेवर जावुन थांबेन.
वरील प्रमाणे विद्यार्थ्याना भाजी घ्या ,फळ घ्या, फुलं घ्या असा वेगवेगळा सराव करावा.
✌🏼तीनवेळा भाजी विकुन झाल्यावर भाजी विकणारा विद्यार्थी अभिव्यक्ती सादर करेल..कोणतेही...
शिक्षकांसाठी सुचना
✍🏼भाजी ,फळ ,फुलं हे पुन्हा होणार नाही यांची काळजी घ्यावी.
उदा. फुल घ्या म्हणाल्यावर एकदा गुलाब हे उत्तर दिल्यास येणार नाह यांची काळजी घ्यावी.
🎓अशा प्रकारे फळाचे नांवे, फुलांची नांवे, भाज्याची नांवे पाठ होतील सर्व विद्यार्थ्याना भाजीवाला होता येईल.
🎊🎊फायदे🎊🎊
✍🏼 हजर जबाबी पणा वाढेल नक्कल करणाराची कृती इतरापेक्षा वेगळी असणार त्यामुळे मनोरंजन होईन.
✍🏼 मनोरंजानात्मक खेळ व अभ्यास होईन आणि मुलांना खुपच गमत वाटेल.
✍🏼भाजीवाला फळ ,भाजी , फुलं घ्या यापैकी काय विचारणार यांची उत्सुकता वाढेल त्यामुळे मुले चुका करतील
✍🏼 मुलांचे अवधान टिकुन राहीन
✍🏼 फळाचे,फुलांची,भाजीची नावे हसत खेळत पाठ होतील..
✍🏼 संकलन व शब्दाकंन✍🏼
विजागत ज्ञानेश्वर
www.esmartguruji.blogspot.in
9421295027
कृपया एकवेळ हा खेळ खेळून पाहाच
SCERT PUNE भाषा प्रशिक्षणातून साभार दि. 23/6 ते 24/6/2016

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
THANK YOU