बुधवार, २१ ऑक्टोबर, २०१५

मनोगत

            
       शिक्षक बंधु व भगिनीनों,
                        सप्रेम नमस्कार,
            पंढरपूर सारख्या दक्षिण काशी म्हणुन प्रसिध्द असलेल्या व विठ़ठलाच्या या पावन भुमित नवविधी भक्ती केली जाते त्यालाच भक्तीचे रुप मानले जाते . त्याच भुमीत'' ज्ञान'' या भक्तीने सर्व बालकांचा आधुनिक तंत्राच्या साहयाने उन्नती व्हावी हा हेतु मनात धरुन जे माझ्याकडे आहे ते देणे व दुसर्या कडचे सर्वापर्यत पोचवणे हाच हेतु मनात धरुन महाराष्ट्रातील सर्वाना याचा फायदा होण्यासाठी eSmartGuruji  या ब्लॉगची निर्मिती केली आहे. eSmartGuruji हा बॉग प्रसिध्द करताना मला विलक्षण आनंद होत आहे..कारण ज्ञानदानाचे पवित्र काम करत असताना तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर व नवनिर्मिती व्हावी आणि शिक्षकांना तांत्रिक साहय व्हावे यासाठी हा माझा छोटासा प्रयत्न आहे.
     आपण सर्वजण संगणक साक्षर आहात पण अध्यापनात तत्रज्ञानाचा वापर करताना काही अडचणी येतात त्या मध्ये महत्वाच्या टिप्स या ब्लॉग कडुन मिळतील अशी मला खात्री आहे. तसेच महाराष्ट्रातील सर्व eSmartGuruji  चा फायदा मिळवुन देता यावे या साठी हे नांव ब्लॉगला दिले आहे.
    जे जे नविन आहे ते ते येथे आपणास उपलब्ध करुन देण्याचा माझा प्रयत्न आहे....eSmartGuruji हा ब्लॉग गेल्या दोन वर्षापासुन माझ्या काही कारणाने पेंडिंग मध्ये होता.  या ब्लॉग निर्मितीसाठी मला प्रेरणा देणारे माझी आई सुमन व माझे वडिल बुध्दवासी सुखदेव विजागत व माझा मोठा विठठलभाऊ  यांचे आर्शीर्वाद, सतत कामात मदत करणारी माझी पत्नी ऋजुता व माझ्या चिमुकल्या, माझे तंत्रस्नेही गुरु प्रो. दिपकजी ताटपुजे सर सातारा,श्री.वसंत काळपांडे  साहेब, शिक्षणविस्तार अधिकारी श्री. मुधोळकर साहेब, व माझे सर्व मित्र...मार्गदर्शक भास्कर ओव्हाळ (मामा) , सहदेव ओव्हाळ सर, गटशिक्षणाधिकारी श्रीमती सुलभा वठारे पंढरपुर, विस्तार अधिकारी श्री. लवटे साहेब, केंद्रप्रमुख श्री. चव्हाण साहेब, मुअ. श्री. कोरे व्ही.बी. व माझा पुतण्या देवा विजागत यांच्या कडुन मार्गदर्शन व योगदान मिळाले. तसेच माझा मोठा तंत्रस्नेही मित्रपरिवार व माझे ज्ञात व अज्ञात शुभचिंतक, सकुंल चळे  ता. पंढरपुर, माझे सकुंल गोळेगांव मु.अ श्री. कदम यु.जी., श्री. तोगरवाड सर माझी शाळा हस्सा व कावल गुडा स्टाफ श्री कसलोड संजय श्री ebitwar सर  रामदीनवार, पोकळे मॅडम, उपलंचवार मॅडम ,कदम पी.एस.सर व smc सर्व सदस्य , गटसाधन केंद्र उमरी जि. नांदेड, या सर्वाचा मी आभार व ऋणी आहे.
    जनमाणसात आणि चिमुकल्यांच्या आधुनिक भावविश्वात येणार्या बदलासाठी व तंत्रज्ञानाच्या वापरातील नवनविन अहवानासाठी ताकद व प्रगतीशील विचारांची कास मिळो शिक्षकांचे कार्य अतिशय सुलभकपणे होवो हीच सदिच्छा सर्वांना कोटी कोटी शुभेच्छा व आभार..!!!!!!!!! 

  आपला 
विजागत ज्ञानेश्वर सुखदेव
जि.प.प्रा.शा.ढोलेवस्ती
ता.पंढरपुर जि. सोलापुर