डिसेंबर 2005 पासुन मी जि.प.प्रा.शाळा हस्सा ता.उमरी जि. नांदेड येथे शिक्षणसेवक पदावर रुजु झालो हे काम करत असताना खुप खुप अनमोल अनुभव आले त्यापैकी मला 7.2 वर्षात मु.अ या पदावर उपस्थित झाल्यापासुन खुप शिकायला मिळाले.
3 वर्ष एकटानेच 109 पट सांभाळून 1 ते 5 वर्ग ही सांभाळणे हे माझ्या आयुष्यात फार मोठे चांलेज होत.हे करताना खुप अनुभव आले त्यात 2 वर्ग खोली बांधकाम 1 किचन शेड व शौचालय असा बाधकामाचा अनुभव मोठा अनुभव आला .
अभिमानाची गोष्ट म्हणजे एक जि.प.ची 4 थी ची शाळा 7 वी पर्यत करण्याचं भाग्य मला मिळालं आणि ते फक्त रामदिनेवार सर, पोकळे मॅङम, उपलंचवार मॅङम या 3 साथीदाराच्या मदतीने केले आणि पट टिकवुन ठेवल्याने ग्रामीण भागातील मुलीेना फायदा झाला आणि 6 वर्षी 1 शिक्षकाचे 7 शिक्षक झाले आणि नोकरीत पहिल्यादाच खरा आनंद काय असतो याची प्रचिती झाली.नविन जी.आर आला आणि मु.अ पद मान्य होवुन भरले आणि माझी प्रशासकीय बदली जवळच्या कावलगुडा बु येथे झाली खुप रडु आले पण काय ईलाज नव्हता बदली झाली आणि अगदी 8 वर्षात पहिल्यादाच स.शि म्हणुन काम करायला मिळाले आणि अल्प वधित कदम सराच्या अनुभवाने कावलगुङा शाळेचे ही कायापालट करणाचा प्रयत्न केले Digital school साठी सर्व पुर्वतयारी झाली होती पण ते माझ स्वप्नहे स्वप्नच राहुन गेलं पण याची पावती म्हणुन मला 4 पुरस्काराने सन्मानित केले माझी आंतर जिल्हा बदली जुन 2015 रोजी नादेड ते सोलापुर झाली.आणि माझ्या बर्याच समस्या आपोआप दुर झाल्या अाणि पुन्हा काम करण्यासाठी प्रेरणा मिळाली आणि ब्लॉगचे updatation चालु केले .... सर्वापासुन काम करण्याचे प्रेरणा व नवनविन शिकायला मिळो हीच कामना ..